श्रीलंकेला नमविण्याचे ‘या’ संघाकडे आहे आव्हान !
बातमीदार | ५ सप्टेंबर २०२३ | बांगलादेशकडून रविवारी पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे अफगाणिस्तान संघ आशिया चषकातून बाहेर पडण्याच्या स्थितीत आहे. हे टाळण्यासाठी मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध विजय मिळविण्याचे त्यांच्यापुढे अवघड आव्हान असेल. ब गटात दुसऱ्या स्थानावर राहण्यासाठी त्यांना मोठ्या फरकाने सामना जिंकावा लागेल.
बांगलादेशला नमविणाऱ्या लंकेची धावगती ०.९५१ तर अफगाणिस्तानची धावगती उणे आहे. अफगाणविरुद्ध ३०० धावा ठोकल्याने बांगलादेशची धावगती उत्कृष्ट झाल्याने हा संघ सुपर फोरमध्ये दाखल होऊ शकतो. कर्नल गडाफी स्टेडियमवर धावडोंगर उभारला जाण्याची शक्यता आहे. वेगवान माऱ्याअभावी बांगलादेशच्या गोलंदाजीची भिस्त राशीद खान आणि मुजीब जदरान यांच्यावर असेल. राशिदला काल एकही गडी बाद करता आला नव्हता. लंकेला नमविण्यासाठी अफगाण संघाला क्षेत्ररक्षण, फलंदाजी आणि गोलंदाजी सुधारावी लागेल. लंकेलादेखील आघाडीच्या फळीकडून धावांची अपेक्षा असेल. बांगलादेशविरुद्ध युवा मथिशा पथिराना याने चार गडी बाद केले. तो पन्हा एकदा नवा चेंड हाताळेल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम