राज्यात हजारो तरुणांना मिळणार सरकारी नोकरी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ६ नोव्हेबर २०२३

राज्यातील अनेक तरुणांनी उच्च शिक्षण घेवून देखील नोकरी मिळत नसल्याने अनेक तरुण आज देखील खाजगी क्षेत्रात काम करीत आहे. याच तरुणासाठी मोठी बातमी समोर आली आहे. ज्यांना शासकीय सेवेत नोकरी करण्याचे स्वप्न असेल त्यांच्यासाठी हि एक मोठी संधी असू शकते. महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे.
भरतीच्या माध्यमातून बहु-कार्यकारी कर्मचारी, निम्न विभाग लिपिक, उच्च विभाग लिपिक/ उच्च विभाग लिपिक कॅशियर, मुख्य लिपिक/ सहाय्यक आणि सामाजिक सुरक्षा अधिकारी/ व्यवस्थापक श्रेणी II/ अधीक्षक या पदांच्या तब्बल 17,710 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी

भरले जाणारे पद – बहु-कार्यकारी कर्मचारी, निम्न विभाग लिपिक, उच्च विभाग लिपिक/ उच्च विभाग लिपिक कॅशियर, मुख्य लिपिक/ सहाय्यक आणि सामाजिक सुरक्षा अधिकारी/ व्यवस्थापक

श्रेणी II/ अधीक्षक

पद संख्या – 17,710 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल)

E-Mail ID – e1hq@esic.nic.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – निशांत कुमार, उपसंचालक, DPC सेल, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पंचदीप भवन, CIG रोड, नवी दिल्ली-110002.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2023 (जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसांच्या आत)

वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे

भरतीचा तपशील – (ESIC Recruitment 2023)

पद पद संख्या

बहु-कार्यकारी कर्मचारी 3341 पदे

निम्न विभाग लिपिक 1923 पदे

उच्च विभाग लिपिक/ उच्च विभाग लिपिक कॅशियर 6435 पदे

मुख्य लिपिक/ सहाय्यक 3415 पदे

सामाजिक सुरक्षा अधिकारी/ व्यवस्थापक श्रेणी II/ अधीक्षक 2596 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ESIC Recruitment 2023)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता

बहु-कार्यकारी कर्मचारी Matriculation or equivalent

निम्न विभाग लिपिक —

उच्च विभाग लिपिक/ उच्च विभाग लिपिक कॅशियर Any Degree, Knowledge of computer

मुख्य लिपिक/ सहाय्यक —

सामाजिक सुरक्षा अधिकारी/ व्यवस्थापक श्रेणी II/ अधीक्षक Any Degree, Knowledge of computer

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
4. अर्ज करताना आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम