अमित शहाचा अजित पवारांना मुख्यमंत्री बनवतील ; संजय राऊत !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ६ नोव्हेबर २०२३

राज्यातील अजित पवारांचे कार्यकर्त्यांसह आता त्यांची आई देखील दादांना मुख्यमंत्री पदी बघण्याचे स्वप्न असल्याच्या बातम्या आल्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, आईची इच्छा तर अशीच असते. मात्र, अजित पवार आज जे काही बनले आहेत ते शरद पवार यांच्यामुळे. अजित पवार यांच्या आईच्या इच्छेला मी प्रणाम करतो. मात्र, शरद पवार यांनीच अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले होते. आता मुख्यमंत्री बनण्यासाठी अजित पवार अमित शहांकडे गेले असतील तर अमित शहा त्यांना मुख्यमंत्री बनवतील, असा टोला राऊतांनी लगावला. निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीत फूट पडेल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केले होते. त्यावरही संजय राऊतांनी अमित शहांवर निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले, अमित शहा यांना इंडिया आघाडीची काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीकडे लक्ष द्यावे. तिथे भाजपचा पराभव आणि इंडिया आघाडी विजय होताना दिसत आहे. त्यामुळे अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडिया आघाडीची चिंता करायची गरज नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम