तीन तरुणांना थरारक बाईक स्टंट करणे पडले महागात ; पहा व्हिडीओ !
दै. बातमीदार । ७ एप्रिल २०२३ । देशात अनेक ठिकाणी अपघाताची मोठी मालिका सुरूच आहे. त्यातच सोशल मिडियाचे जाळे देशभर पसरल्याने कोणतीही व्हिडीओ शेअर केला तर तो अवघ्या काही मिनिटात देशभर व्हायरल होत असतो. अशीच एक घटनेच व्हिडीओ व्हायरल झालेला आहे.
बाईक स्टंट करणाऱ्या मुलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. स्टंट करण्यासाठी तरुण वर्ग जीव धोक्यात घालायला तयार असतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही मुले बाईकवर एक जीवावर बेतणार स्टंट करताना दिसत आहेत.
और कर लो मस्ती रोड पे👇😂 pic.twitter.com/wEBl6m6O4t
— Neha Agarwal (@NehaAgarwal_97) March 29, 2023
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, 3 मुले स्प्लेंडर बाईक चालवत आहेत आणि रस्त्याच्या मधोमध सापासारखी बाईक चालवत आहेत. त्यांनतर काही क्षणांत बाईकचा तोल बिघडतो आणि बाईक रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकावर आदळल्याचे व्हिडिओत तुम्हाला दिसत आहे. तिन्ही मुले दुचाकीवरून खाली पडतात. तिघांच्या मागून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने ही घटना कॅमेऱ्यात कैद केली, ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. @NehaAgarwal_97 नावाच्या युजरने 29 मार्च रोजी हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. कॅप्शनमध्ये लिहिले आहे- और कर लो मस्ती रोड पर…. या व्हिडिओला आतापर्यंत 32 हजारांहून अधिक व्ह्यूज, 500 लाईक्स आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम