पवारांचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी घेतला का ? खर्चावर लावली कात्री !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ एप्रिल २०२३ ।  राज्यात शिंदे गटाचे व ठाकरे गटाचे वाद सुरु असतांना विरोधी पक्ष नेत्यांनी काही दिवसांपूर्वी वर्षा बंगल्याचं खानपानाचं बिल २ कोटी ३८ लाख अस सांगत चहात सोन्याचं पाणी घातलं होतं काय? असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारनं पाहुणचार खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा सल्ला मनावर घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या सरकारी निवासस्थानी येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या खानपान सेवांसाठी पुरवठादार निश्चित करण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी जाहीर केला. शिंदे सरकारनं सरकारी निवासस्थानवरील पाहुणचार खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षा बंगल्यासह सागर निवासस्थानवरील खर्चही आटोक्यात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही निवासस्थानावरील पाहुणचार खर्चाच कंत्राट दोन वेगवेगळ्या खासगी कंत्राटधारकांना देण्यात आलं आहे.

या दोन्ही निवासस्थानी खानपानासाठी अंदाजित खर्च अनुक्रमे ३.५० कोटी आणि १.५० कोटी इतका असल्याचे सांगण्यात आले. वर्षा आणि सागर या निवासस्थानी मान्यवर अतिथींसाठी खानपान सेवा पुरविणाऱ्या पुरवठादाराची नियुक्ती करण्यासाठी अंदाजित ५ कोटी रुपयांची ई-निविदा गेल्या वर्षी जाहीर करण्यात आली होती.
या करारानुसार विविध पदार्थांचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भात या दोन्ही निविदाकारांशी करार करण्यात आला असून अटी आणि शर्थी पुरवठादारास बंधनकारक असणार आहेत.

वर्षा सागरसाठी दर निश्चित

वेफर्स १० रुपये

मसाला चहा १४ रुपये

मसाला दुध १५ रुपये

कोथिंबीर वडी, समोसा, उकडीचे मोदक- १५ रुपये

साधारण शाकाहारी बुफे- १६० रुपये

विशेष शाकाहारी बुफे- ३२५ रुपये

साधारण मांसाहारी बुफे- १७५ रुपये

अजित पवार काय म्हणाले होते?

राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशनापूर्वी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधल होता. यावेळी त्यांनी सरकारी निवासस्थानवरी खानपानाचं भाष्य केलं होतं. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याचं ४ महिन्यांचं खानपानाचं बिल २ कोटी ३८ लाख रुपये आलेलं आहे. सारमाध्यमांनी तशा बातम्या दिलेल्या आहेत. वर्षा बंगल्यावर चहामध्ये काय सोन्याचं पाणी घातलं जायचं काय? असा संतप्त सवाल पवारांनी उपस्थित केला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम