ठाकरेंचा फडणवीसांना इशारा ; परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ जून २०२३ ।  देशातील तब्बल १५ पक्ष भाजपच्या विरोधात एकवटले असून नुकतीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परिवार वाचवा बैठकीसाठी पाटण्याला गेले आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती. फडणवीस यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे. तुमच्याही परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही त्यावर अजून बोललो नाही. आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. तुम्हाला कोणतीही आसनं झेपणार नाही. फक्त झोपावं लागेल, असा गर्भित इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

दादरच्या शिवाजी मंदिरात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी हा इशारा दिला. मी परिवाराबाबत संवेदशनील आहे. सूरज आमि शिवसैनिक माझं कुटुंब आहे. माझ्या कुटुंबाची मी काळजी घेईल. परिवाराबद्दल बोलू नका. अनेकांचे अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत, असं सांगतानाच सूरजवर धाड टाकली. तो साधा शिवसैनिक आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी येत्या 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्याचं जाहीर केलं. येत्या 1 तारखेला आपण महापालिकेवर मोर्चा काढणार आहोत. शनिवारी निवेदन कोणाला देणार? असं आम्हाला विचारलं जात आहे. अरे आम्हाला निवेदन द्यायचंच नाही. ज्यांना निवेदन द्यायचं आहे तेच सत्ताधाऱ्यांच्या टेबलाखाली बसले आहेत. त्यामुळे निवेदन कोणाला देणार? कोव्हिड काळातील भ्रष्टाचार जरूर काढा. देशभरात जे सर्व्हे झाले तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून आलं. ही त्यांची पोटदुखी आहे. त्यामुळे निवडणुकीत त्यांना जमाल गोटा द्यायचा आहे. त्यांना घोड्याचंच औषध द्यावे लागेल. तरच त्यांचा कोठा मोकळा होईल, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम