आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी ; सर्व पक्षीय नेत्यांची बैठक !
बातमीदार | ११ सप्टेंबर २०२३ | राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आज १४ वा दिवस असून देखील आजवर मागण्या मान्य न झाल्याने त्यांचे उपोषण आंदोलन अजूनही सुरू असून या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षिय नेत्यांची बैठक बोलवली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे होत असलेल्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान टिकेल असे आरक्षण देण्याची राज्य सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.
इतर समाजाचं आरक्षण कमी न करता पूर्वी जसे मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, तिचं भूमिका सरकारची आहे. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला, तेव्हा आम्ही ज्यांची सिलेक्शन झालं होतं पण त्यांना नेमणूक मिळाली नव्हती अशा ३७०० तरुणांना नोकऱ्या दिल्या. म्हणून सरकार सकारात्मक आहे. सगळ्या योजना, ओबीसींना मिळणारे सर्व लाभ आपण मराठा समाजाला देतोय, असे शिंदे म्हणाले.
आरक्षण टिकणारं असलं पाहीजे, कायद्याच्या चौकटीत त्याला बाधा येऊ नये अशी सरकारची भूमिका आहे. यासाठीच सर्वांना बैठकीला बोलवलं आहे. मराठा समाजाला न्याय कसा मिळेल यासाठी विरोधकांनी सूचना दिल्या पाहिजेत एवढीच आमची आपेक्षा आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. मराठा आरक्षम न्यायालयात टिकलं नाही तर ही फसवणूक ठरेल. शासन कोणालाही फसवू इच्छित नाही. तात्पूरतं काम करून उपयोग होणार नाही, जे करू ते कायदेशीर आणि समाजाला फायदा मिळेल असं करू असेही शिंदे म्हणाले. विरोधकांनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे,कारण हा सामाजिक प्रश्न आहे, राजकीय प्रश्न नाही. दुर्घटना होऊ नये यासाठी विरोधीपक्षांनी देखील जबाबदरी घ्यावी आणि राजकारण न करता सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम