राज्यात आंदोलन सुरु असतांना मुख्यमंत्री व्यस्त ; संजय राऊत !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ११ सप्टेंबर २०२३ | राज्यातील जालना जिल्ह्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरु असतांना मुख्यमंत्री इतरत्र व्यस्त असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्री सध्या तीर्थयात्रेतच व्यस्त असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे हे जंत्र, मंत्र, जादू टोना यातच अडकलेले असल्याचा आरोपा संजय राऊत यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आधी राजस्थान आणि नंतर दिल्लीला गेले होते. दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी G-20 परिषदेनिमित्त आलेल्या पाहुण्यांची भेट घेतली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनाही भेटले. तसेच त्यांनी केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण, पर्यावरण मंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्याशीही चर्चा केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते भीमाशंकर मंदिरात दर्शन घेणार आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्यांवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

साताऱ्यामध्ये दंगलसदृश्य परिस्थिती का निर्माण झाली? असा प्रश्न उपस्थित करत खासदार संजय राऊत यांनी हे सरकारचे अपयश असल्याचा आरोप केला आहे. G-20 परिषदेत जाऊन पार्ट्या झोडत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. त्यापेक्षा सरकारने जालन्यात मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
मुख्यमंत्री दिल्लीहून आल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. तेथे ते भीमाशंकरचे दर्शन घेणार आहेत. एकिकडे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. तर दुसरीकडे मुख्यमंत्री तीर्थयात्रेतच व्यस्त आहेत. जंत्र, तंत्र, मंत्र जादू टोना यातच ते अडकलेले आहेत, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मराठा आरक्षण प्रश्नी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहे. त्यांनी ठाणे बंदची हाक दिली आहे. त्याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम