आजचे राशीभविष्य, बुधवार २८ सप्टेंबर २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | २८ सप्टेंबर २०२२ | मेष – चांगले वाचन कराल. जुन्या प्रश्नांची उजाळणी होईल. मनाला आवडते पदार्थ चाखाल. परीवारातील वातावरण चांगले राहील.

वृषभ – कुटुंबासमवेत दिवस चांगला जाईल. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल. दिवस खुशीत घालवाल. मित्रांशी वाद घालू नका.

मिथुन – जोडीदाराचे कौतुक केले जाईल. तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल. बौद्धिक चुणूक दाखवण्याची संधी मिळेल.

कर्क – मनातील इच्छेपुढे इतर गोष्टी गौण मानाल. मनासारखी खरेदी कराल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील.

सिंह – थोडावेळ स्वत:साठी राखून ठेवा. सहकार्‍यांकडून फार अपेक्षा ठेऊ नका.

कन्या – अतिश्रमाचा ताण जाणवेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. व्यावसायिक खर्चाची चिंता मिटेल. घरातील मोठ्या लोकांचे मत जाणून घ्या.

तूळ – झोपेची तक्रार जाणवेल. कामात स्त्रियांची मदत होईल. पोटाची तक्रार लक्षात घ्या.

वृश्चिक – काही मोठ्या लोकांच्या संपर्कात याल. क्रोधावर नियंत्रण ठेवा. मुलांचे स्वतंत्र विचार जाणून घ्या.

धनू – शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष नको. गरजूंना मदत कराल. कामाच्या ठिकाणी मान वाढेल.

मकर – नवीन कामासंदर्भात बोलणी होतील. जुन्या मतांना बाजूला सारा. अति विचार करणे टाळा. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.

कुंभ – अतितिखट पदार्थ खाऊ नका. शिस्तीचा अतिरेक करू नका. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल.

मीन – क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. फार गरज असेल तरच प्रवास करावा. वाहन चालवताना सावधानता बाळगा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम