आजचे राशिभविष्य दि २३ मे २०२३
मेष: आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीत संघर्षाचे प्रसंग घडतील. काही बाबतीत मानसिक ताणतणाव निर्माण होतील. व्यापारात महत्वाचे निर्णय शक्यतो आज टाळावेत. नातेवाईकांशी असलेल्या संबंधात मर्यादा राखा. मानसिक ताणतणावामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात विवाद टाळावेत. शक्यतो दुरवरचे प्रवास नुकसानकारक ठरतील.
वृषभ: आपल्या अंगीभूत कलागुणांना चांगले वातावरण राहील. आध्यात्मिक व धार्मिक स्वरूपाचं लेखन होईल बेरोजगारांना रोजगार मिळेल. व्यापार व्यवसायातील वातावरण चांगले राहील. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागतील. विवाह इच्छूकांचे विवाह जुळून येतील. संततीकडून शुभवार्ता समजतील.
मिथुन: व्यापारात उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढेल. दैवी पाठबळ लाभणार नाही. वास्तुविषयी प्रश्न, कामे रेंगाळतील. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी. बोलताना शब्द तोलुन-मापून वापरावेत, अन्यथा समोरचा व्यक्ती दुखावला जाण्याची शक्यता आहे. व्यापारात नुकसान संभवते. समाधानात वृद्धी करणारा दिवस आहे. वाहन घर खरेदीचा योग आहे. स्थावर मालमत्तेत वाढ होईल. सुखकारक दिनमान असेल.
कर्कः नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकेल. संशोधनात्मक कार्य आपल्या हातून होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला फायदा होईल. परंतु, अप्रतिष्ठा होण्याचे योग आहेत. काहीना प्रमोशन मिळण्याची किंवा वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात वृद्धि होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही, या विषयी काळजी घ्यावी. नवीन ओळखीतून फायदा होईल.
सिंह: नोकरीत गैरसमजाचे वातावरण राहील. वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागेल. वरिष्ठांकडून कामाची अपेक्षा वाढणार आहे. व्यापारात फसगत होण्याची शक्यता आहे. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीवर फारसे विसंबून राहू नका. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही, याकडे लक्ष द्यावे. अपेक्षित कामे रखडण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या कारवाया वाढतील. त्यामुळे ताणतणाव वाढण्याचे योग आहेत.
कन्या: आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी राहील. लिखाणास उत्तम दिवस आहे. विद्याभ्यासात प्रगती राहील. आज मानसन्मान पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. आपले कर्तुत्व सिद्ध कराल.
तुला: आज काही बाबतीत यश संपादन करू शकाल. व्यापार रोजगारात आर्थिक उन्नती होईल पण खर्चाचे प्रमाणही वाढेल. आपल्या आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. नोकरीत बढतीची शक्यता राहील. राजकारणात किंवा समाज कारणात आपली प्रतिष्ठा ढासळ्याची शक्यता आहे. पत्नी-संततीसाठी खर्च होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक: नवीन जागा घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. नोकरीत प्रशंसा केली जाईल. प्रलोभनाला मात्र बळी पडू नका. व्यापारात नवीन योजना आखाल. नवीन उपक्रम सुरू कराल. आत्मविश्वास व मनोबल उंचावलेले राहील. संतती सौख्य उत्तम राहील. शेअर्स मधील दिर्घकालीन गुंतवणुक फायदेशीर ठरेल. घरातील मोठ्या व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. कर्जाची मागणी मंजूर होईल. पत प्रतिष्ठा वाढेल.
धनु: पती-पत्नीमध्ये बेबनाव गैरसमज होणार नाही याविषयी काळजी घेणे योग्य ठरेल. नोकरीत खूप मेहनत घ्यावी लागेल. आपल्या विरुद्ध मात्र गैरसमज किंवा निंदानालस्ती होण्याची शक्यता आहे. मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता राहील. हातून वाईट अनैतिक कृत्य होण्याची संभावना आहे. जमीन जुमल्याच्या व्यवहारात नुकसान होईल. आर्थिक प्रकरणात नुकसान होऊ शकते.
मकर: आपले वर्चस्व सिद्ध कराल. व्यापारात विरोधक आक्रमक होतील. त्याचा बीमोड करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. मित्रमैत्रिणींकडून सहकार्य मिळेल. स्विकारलेली कामे यशस्वी होतील. मनाजोग्या घटना घडतील. आर्थिक आवक वाढेल. दूरवरचे प्रवास शक्यतो टाळावेत. वाहन सावकाश चालवा. नव्या योजनाना आज चांगला प्रतिसाद मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.
कुंभ: बढतीची शक्यता आहे. नवीन संधी नवीन मार्ग सापडतील. संकुचित मनोवृति टाळावी. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पदप्राप्ती मिळेल. आपली प्रतिष्ठा वाढीस लागेल. कामात यश आल्याने आपले मनोधर्य उंचावेल. दुर्व्यसनांपासून सावध राहा. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. शासकीय कामकाजास शुभ दिनमान आहे. गूढशास्त्राकडे कल राहिल. वैवाहिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी.
मीन: अध्यात्म क्षेत्रात रममाण होण्याची शक्यता आहे. भाग्योदय होण्याचा योग असून मान्यवर व मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. आपले डावपेच यशस्वी होतील. सत्संग संत दर्शन घडेल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. व्यापारात योजना सफल होतील. मंत्रजप ईश्वराची आराधना याकडे कल राहील. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहील. प्रवासातुन आर्थिक लाभ होईल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम