
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप
भडगाव/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना भडगाव तालुका, शहर व अंगीकृत आघांडीच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी रुग्णालयात उपस्थित 160 रुग्णांना विविध प्रकारचे फळ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी तालुकाप्रमुख संजय पाटील व शहरप्रमुख अजय (आबा)चौधरी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल नेतकर, नगरसेवक अतुल पाटील, नगरसेवक जग्गु भोई, नगरसेवक संतोष महाजन, सरपंच मोहन पाटील, प्रदीप महाजन, सौरभ पाटील, बापू पाटील, विनोद भोई ,ईनुस खान, महेंद्र ततार, मयुर महाजन, पुरुषोत्तम सपके आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय चौधरी तर आभार विनोद भोई यांनी मानले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम