आजचे राशीभविष्य, रविवार १८ सप्टेंबर २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | १८ सप्टेंबर २०२२ | मेष – ठरवलेले विचार अचानक बदलू नका. वरिष्ठ अधिकार्‍यांचे सहकार्य लाभेल. परदेश कंपनी कडून लाभाचे योग. उत्पन्नात वाढ होईल.

वृषभ – धन वृद्धीचे योग जुळून येतील. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. आरोग्यात सुधारणा दिसून येईल.

मिथुन – मुलांची एखादी कृती त्रस्त करू शकते. कौटुंबिक वातावरण जपावे. मनोबल वाढीस लागेल.

कर्क – आजचा दिवस लाभदायक. ज्येष्ठ व्यक्तींचे अमूल्य सहकार्य लाभेल. कार्य शक्तीचे कौतुक केले जाईल.

सिंह – तुमच्या ज्ञानाच्या अनुभवाचे कौतुक केले जाईल. तुमच्या बोलण्याचा समोरच्यावर प्रभाव पडू शकेल. सारासार विचार लाभदायक ठरेल.

कन्या – लपवाछपवीच्या गोष्टी करू नका. धन संचयात वाढ होण्याची शक्यता. बचतीच्या योजना आखाल. मागे हटू नका.

तूळ – तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. कामात सुलभता जाणवेल. प्रलंबित योजना मार्गी लावाल.

वृश्चिक – काम करताना सावधानता बाळगावी. तीव्र इच्छा जागृत ठेवावी. वस्तु खरेदी करताना चोखंदळ रहा. अन्यथा नुकसान संभवते.

धनू – कौटुंबिक प्रश्न प्राधान्याने सोडवा. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. क्षुल्लक गोष्टीने खट्टू होऊ नका.

मकर – कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. योग्य संधीची वाट पाहावी. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. कामाच्या स्वरुपात काहीसा बदल संभवतो.

कुंभ – आर्थिक गोष्टींकडे कटाक्षपणे लक्ष द्या. विवाह इच्छुक असलेल्यांना शुभ वार्ता मिळेल. नेतृत्व गुण वाढीस लावा.

मीन – उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या संपर्कात याल. मुलांना नवीन संधि लाभू शकते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम