TODAYS HOROSCOPE । आजचे राशिभविष्य; दि. १२ एप्रिल २०२४

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ मे २०२४ । १२ मे २०२४ म्हणजेच वैशाख शुक्ल पंचमीला रविवार असणार आहे. आजच्या दिवशी आद्रा नक्षत्रात धृती योग जुळून येणार आहे. या दिवशी सूर्य मेष राशीत तर चंद्र मिथुन राशीत असणार आहे. आजच्या दिवशी सकाळी ११ वाजून ५१ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. आजच्या दिवशी तुमच्या राशीच्या नशिबात नेमके काय लिहून ठेवले आहे हे पाहूया…

मेष:-मानसिक अस्वास्थ्याला बळी पडू नका. गायन कलेचे कौतुक केले जाईल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील.

वृषभ:-हौस पूर्ण करता येईल. मैत्रीचे संबंध जोडले जातील. इतरांवर तुमचा चांगला प्रभाव पडेल. कलेचे आवड जोपासता येईल.

मिथुन:-आर्थिक निर्णय घाईने घेऊ नका. स्त्री वर्गापासून सावध राहावे. क्षणिक मोहाला बळी पडाल. अनाठायी खर्च केला जाईल. .

कर्क:-मित्र परिवारात वाढ होईल. दिवस कामात व गडबडीत जाईल. सर्वांना आनंदाने आपलेसे कराल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

सिंह:-कामातून मानाची जागा मिळवाल. उत्कृष्ट बोलण्याने इतरांचे मन जिंकून घ्याल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.

कन्या:-कला जोपासायला वेळ काढता येईल. धार्मिक कामात मदत कराल. विशाल दृष्टिकोन ठेवून वागाल. कामातील अडथळे दूर होतील.

तूळ:-जोडीदाराबरोबर क्षुल्लक कारणांवरून वाद संभवतो. आपलेच मत खरे करण्याचा प्रयत्न कराल. भागीदारीच्या व्यवसायात सबुरीने वागावे. वारसाहक्काची कामे फायदेशीर ठरतील.

वृश्चिक:-एकमेकांच्या मताचा आदर करावा. आपले मत शांतपणे मांडावे. सहकार्‍यांना सोबत घेऊन चालावे. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे.

धनू:-लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. आळस झटकून कामाला लागावे. रेस सट्टा सारख्या व्यवहारात सतर्क रहा. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.

मकर:-प्रेमाच्या दृष्टीने मैत्री लाभेल. व्यवहारी भूमिका घ्यावी लागेल. तुमच्या छंदाचे कौतुक केले जाईल. गप्पा गोष्टी करण्यामध्ये गुंग व्हाल.

कुंभ:-घरगुती सुख सोईंकडे लक्ष द्याल. कौटुंबिक कटुता टाळण्याचा प्रयत्न करा. घरातील टापटि‍पी बाबत आग्रही राहाल. जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल.

मीन:-नातेवाईकांशी सलोखा वाढेल. कलेची आवड जोपसाता येईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम