आचारसंहिता काळात पिंपरी-चिंचवड ग्रामीण भागात १३ कोटी ९६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ मे २०२४ । केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात १३ कोटी ९६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये रोकड, मद्य, सोने-चांदीसह दागिने, अंमली पदार्थ आणि मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी इतर वस्तुंचा समावेश आहे.

“… ही माहिती देणारे गृहमंत्र्यांच्याच आजूबाजूचे आहेत”; मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा!

पुणे, शिरूर आणि मावळ मतदार संघांसाठी १३ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्याच्या तयारीच्या माहितीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सदर माहिती दिली. अधिकारी म्हणाले कि, ‘आचारसंहिता लागल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भरारी पथक, तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली. सदर पथकांनी आतापर्यंत ४.३४ कोटी रुपयांची रोकड, १.६९ कोटी रुपयांचे सोने, चांदी आणि दागिने, ४.९ कोटी रुपयांचा मद्यसाठा, १.१४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ आणि २.७८ कोटी रुपयांचे मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी वाटप करण्यात येणारे साहित्य असा मिळून १३ कोटी ९६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तसेच, राजकीय जाहिराती प्रमाणीकरण करणाऱ्या कक्षाकडून १०० पेक्षा जास्त जाहिरातींचे प्रमाणीकरण केले आहे. माध्यम कक्षाकडून ३८ समाजमाध्यमातील खात्यांवर विनापरवानगी जाहिरात केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. मतदानापूर्वीच्या ४८ तासांत जाहिरात केल्यास कारवाई करण्यात येणार आहे, असे देखील डॉ. दिवसे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम