आजचे राशीभविष्य, बुधवार ३ ऑगस्ट २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ ऑगस्ट २०२२ । मेष – उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. सहकार्‍यांची बाजू समजून घ्या. त्रयस्थ व्यक्तीचा सल्ला घ्यावासा वाटेल. मित्राची चांगली मदत मिळेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे.

वृषभ – खर्च जपून करावा. आज आपल्या मनाप्रमाणे वागाल. कामाच्या ठिकाणी काही समस्या उद्भवू शकतात. कामे नियोजनबद्ध करावीत. जवळच्या व्यक्तीचा आधी विचार करावा.

मिथुन – नवीन योजना राबवताना संपूर्ण खबरदारी घ्यावी. अघळ-पघळ बोलणे टाळावे. गोड बोलण्यावर भर द्यावा. जबाबदारी नेटाने पार पाडावी लागेल. आळस झटकून कामाला लागावे.

कर्क – व्यावसायिक अडचणींवर कौशल्याने मात कराल. चिंतामुक्त व्हाल. हाती घेतलेली कामे नियोजनाने पूर्ण कराल. नवीन संधी उपलब्ध होईल. कामाची दगदग जाणवेल.

सिंह – वादाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करावे. जोडीदाराकडून अपेक्षित साथ मिळेल. थोडेफार मनाचेही ऐकावे. हाती घेतलेल्या कामात निष्काळजीपणा करू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल.

कन्या – नवीन तंत्र शिकून घ्यावे. व्यवसायात धाडस करताना सावध राहावे. मेहनतीचे महत्व लक्षात घ्यावे. भाग्यावर विसंबून राहू नका. मित्रांची नाराजी ओढवून घेऊ नका.

तूळ – संमिश्र घटनांचा दिवस. नोकरीत सहकार्‍यांकडून मदतीची अपेक्षा ठेऊ नका. मनाचा गोंधळ निर्माण होऊ शकतो. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल.

वृश्चिक – व्यवसायिकांना नवीन संधी चालून येतील. आर्थिक स्थिती सुधारता येईल. प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहील. नवीन ओळखी जनसंपर्कात भर टाकतील. काही परिवर्तन घडून येईल.

धनू – उत्साहवर्धक घटना घडतील. मित्रांकडून भेटवस्तू मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील.

मकर – दिवस मजेत जाईल. आपल्याला अपेक्षित प्रेम लाभेल. काही नवीन गोष्टी आत्मसात करू शकाल. कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडाल. सुखद घटना घडू शकतात.

कुंभ – भूतकाळातील गोष्टींची जाणीव जागृत ठेवाल. पोटाच्या तक्रारी जाणवतील. ज्येष्ठ बंधुचा सल्ला घ्यावा. व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. रागावर नियंत्रण ठेवावे.

मीन – जवळच्या माणसांशी वाद टाळावेत. वेळ जपून वापरावा. हातातील कामात गांभीर्याने लक्ष घाला. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. उगाच चिडचिड करू नका.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम