दिल्लीत पुन्हा तिसरीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ नोव्हेबर २०२२ दिल्लीतील वालकर हत्याकांडाचं प्रकरण ताजं असतानाच नुकतेच आता पुन्हा देशाची राजधानी दिल्ली एकदा हादरून गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील दक्षिण भागातील कालका पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीसोबत लैंगिक शोषणाचं एक प्रकरण समोर आलंय. या शाळेतील सफाई कामगाराने विद्यार्थिनीसोबत हा प्रकार केला असल्याचे समोर आला आहे.

मुलीने असा आरोपहि केला आहे. पोलिसांनी आरोपी सफाई कामगाराला अटक करून त्याच्या विरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाची संपूर्ण माहिती समोर आलेली नाहीये. याआधीही शाळेतील विद्यार्थिनींसोबत अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या वर्षी 6 ऑक्टोबरला दिल्लीच्या केंद्रीय विद्यालयात ११ वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक अत्याचारच्या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला होता. शाळेतील दोन वरिष्ठ विद्यार्थ्यांवर एका विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम