टीम इंडियाची शानदार सुरुवात; पावसामुळे आला होता व्यत्यय !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ नोव्हेबर २०२२ सकाळी नेपियारमध्ये पाऊस झाल्यानंतर सामना होईल की नाही अशी चाहत्यांना चिंता होती. परंतु थोडासा उशिरा सामना सुरु झाला आहे. टीम इंडिया आणि न्यूझिलंड यांच्यात आज निर्णायक सामना सुरु झाला आहे. न्यूझिलंड टीमने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज न्यूझिलंडचा कर्णधार विल्यमसनने काही वैद्यकीय चाचण्या करायच्या असल्यामुळे सुट्टी घेतली आहे. तसेच हार्दीक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडिया आज मालिका जिंकणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

टीम इंडियाच्या गोलंदाजांची सुरुवात चांगली केली आहे. अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज या दोघांनी एक-एक विकेट घेतल्या आहेत. टीम इंडियाची गोलंदाजी सध्या तिथं चांगली होत असून न्यूझिलंडच्या 7.2 ओव्हरमध्ये 50/2 धावसंख्या झाली आहे.

भारताचा संभाव्य संघ:
इशान किशन, ऋषभ पंत , सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पांड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल.

न्यूझीलंडचा संभाव्य संघ:
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे , मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, इश सोधी, अॅडम मिल्ने आणि लॉकी फर्ग्युसन.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम