पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांना आदरांजली !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ ऑगस्ट २०२२ । दिनांक १ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यसेनानी, जहालमतवादी नेते ,शिक्षक, संपादक आणि लेखक तसेच; लोकमान्य; या उपाधीने ज्यांचा उल्लेख केला जातो अश्या बाळ गंगाधर टिळक यांना जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल तर्फे आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका सौ.वैशाली महाजन यांनी नियोजित कार्यक्रमाची रूपरेषा मांडली शाळेच्या परीपाठाच्या वेळेत उपरोक्त कार्यक्रम घेण्यात आला.

BJP add

शाळेचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांच्या हस्ते लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांसमोर लोकमान्य टिळकांच्या प्रखर देशभक्तीचे वर्णन त्यांनी केले. आपल्या भाषणात टिळकांच्या जीवनकार्याविषयी माहिती देत त्यांना लोकमान्य हे नाव कसे मिळाले हि माहिती विद्यार्थ्यांना दिली. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच “ अशी गर्जना देत ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेविरूद्ध संघर्षाला प्रारंभ केला. शिवजयंती आणि गणेशोत्सव या सार्वजनिक सणांद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उभे राहण्यासाठी जागृत केले.केसरी वृत्तपत्रातून जनजागृती केली.

देश कार्यासाठी समर्पित भावना निर्माण केली. देशभक्तांच्या महान कार्याला व समर्पणाच्या भावनेला उजाळा देत नेत्यांचे कृती आणि शब्द हे भावी पिढीसाठी मार्गदर्शन व प्रेरणेचे अखंड स्त्रोत ठरले आहेत असे मत त्यांनी यावेळी मांडले. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये महान देशभक्तांसाठी दर्शविलेल्या आदर व सन्मानाची भावना अधिक बळकट झाली. शाळेचे उपमुख्याध्यापक श्री दिपक भावसार , पोदार जंबो किड्स च्या मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ, प्रशासकीय अधिकारी श्री जितेंद्र कापडे, वरिष्ठसमन्वयक श्री हिरालाल गोराणे , शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी कोविड नियमांचे काटेकोर पणे पालन करीत सामाजिक अंतर राखून कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थिती दर्शिविली होती. शाळेच्या माध्यमिक विभागाच्या समन्वयिका सौ. मेघना राजकोटिया यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम