न्यायालयात सत्याचा विजय होणार : संजय राऊत !

बातमी शेअर करा...

शिवसेना पक्षाचे नाव आणित धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. तर उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. मात्र, या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात विरोध केला असून या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. या प्ररकणावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठाने चार महिन्यांपूर्वी निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयासंदर्भात नियम पाळले जाण्याची टिप्पणी केली होती. या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली आहे.
संविधान, कायदा, विधिमंडळाचे नियम याच्याशी बेईमानी केली जात आहे. वर्षभरापासून महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार चालवले जातेय, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उल्लेख ठाकरे गट नव्हे तर शिवसेना असा करा, हीच खरी शिवसेना असल्याचा दावा देखील खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आमदार अपात्रता आणि शिवसेना पक्ष चिन्हा बाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आधी, त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने त्यांची भूमिका स्पष्ट केली.
आमदारांच्या अपात्रेबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. या प्रकरणी सहा महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही सुनावणी घेतली जात नाही. त्यामुळे घटनाबाह्य सरकारला घटनात्मक पदावर बसलेले विधानसभेचे अध्यक्ष चालवतायत का? की चालवू देतायत? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम