कंत्राटी भरतीवरून विरोधी पक्ष आक्रमक ; कॉंग्रेस नेत्यांची टीका !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | १८ सप्टेंबर २०२३ | राज्यातील शिंदे, फडणवीस व अजित पवार यांच्या सरकारमध्ये कंत्राटी नोकर भरतीवरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. हे नालायक सरकार राज्यातील तरुणाई उद्धवस्त करायला निघाले आहे, अशी टीका करत वडेट्टीवारांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. तुम्ही स्वत:ला मोठे नेते म्हणवता. मात्र, तुम्ही पक्ष फोडला. आता कंत्राटी भरतीचे पाप तरी करू नका, असे वडेट्टीवारांनी अजितदादांना सुनावले आहे.

आज पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी तरुणांना आवाहन केले की, हे नालायक सरकार राज्यातील तरुणाई उद्धवस्त करायला निघाले आहे. मात्र, मुलांनो रस्त्यावर उतरा, आंदोलन करा, जोपर्यंत हे सरकार अध्यादेश वापस घेत नाही. तोपर्यंत मागे हटू नका. दरम्यान, सरकारच्या कंत्राटी भरतीवर अजित पवार यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले असताना अजित पवार म्हणाले, राज्याच्या काही विभागांमध्ये तातडीने पदभरती करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने विविध विभागांमध्ये कंत्राटी स्वरूपात पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कंत्राटी पदभरतीचा निर्णय हा कायमस्वरूपी नसून, तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. अजित पवारांच्या या स्पष्टीकरणावर विजय वडेट्टीवारांनी तीव्र आक्षेप घेत अजित पवारांना खडेबोल सुनावले आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, स्वतःला मोठा नेता म्हणावणारे अजित पवार खोटे बोलून तरुणांची फसवणूक करीत आहेत. अजित पवारांवर माझा हा थेट आरोप आहे. दिशाभूल करणारे वक्तव्य करू नका. महाराष्ट्रातील तरुणांना फसवू नका. तुम्ही पक्ष फोडून गेलात, हा तुमचा विषय आहे. आता तरुणांना उद्धवस्त करण्याचे पाप तरी करू नका. स्वतःला मोठा नेता म्हणून घेत असाल तर हे पाप तुम्ही करू नका, अशा शब्दांत वडेट्टीवारांनी अजित पवार यांना सुनावले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम