हिवाळ्यात चांगली झोप घेण्यासाठी हे उपाय करून पहा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ नोव्हेबर २०२२ नेहमीच चांगले खाणे व पिण्याने तर आरोग्यावर परिणाम होतो पण झोपेमुळे हि आरोग्यावर परिणाम जाणवत असतो हे भरपूर लोकांना माहित नसते. त्यात आरोग्याशी निगडीत अनेक समस्या उद्भवतात.त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. चांगल्या झोपेसाठी रात्री झोपण्यापूर्वी हे पदार्थ खाल्ले तर झोप चांगली लागते आणि दिवसभराचा थकवा निघून शरीर रिलॅक्स होतं.

दूध – दूध आरोग्यासाठी कायमच चांगलं असतं. तज्ज्ञ सांगतात की, हिवाळ्यात झोपण्यापूर्वी दूध प्यायला हवं. त्यात प्रोटीन, कॅल्शियम आणि मिनरल्स सहित अनेक व्हिटॅमिन्स मिळतात. थंडीत गरम दूध प्यायल्याने स्नायूंना आणि शरीराला आराम मिळतो. दूधात हळद मिक्स केल्यानं अधिक फायदे मिळतात.

केळं – फळं आरोग्यासाठी कायमच उपयुक्त ठरतात. लोक सकाळी उठल्यावर केळं आणि ड्रायफ्रूट खातात. पण हेच रात्री झोपण्या आधी खाल्लं तर त्याचा आरोग्याला अधिक फायदा होतो. केळं खाल्ल्याने झोप चांगली येते.

बदाम – बदामामुळे शरीरात उष्णता तयार होते. याच्या सेवनाने फार फायदे होतात. रात्री झोपताना थोडे बदाम खाऊन झोपावं. बदामात हेल्दी फॅट्स, अमिनो अ‍ॅसिड, मॅग्नेशियम असे गुणकारी तत्व असतात. यामुळे शांत झोप लागते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम