
गांधी यांच्याशी आम्ही सहमत नाही : उद्धव ठाकरे
दै. बातमीदार । १६ नोव्हेबर २०२२ राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वीर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले. त्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले. यानंतर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी जे बोलले त्याच्याशी आम्ही सहमत नाही, अशा शब्दात यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात स्पष्ट भूमिका मांडली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला. ‘राहुल गांधी जे बोलले ते चूकच आहे. आमच्याबद्दल सांगायचं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात आदर आहे. स्वातंत्र्यावीरांबद्दल प्रेम कोण व्यक्त करतंय हे देखील पाहावं. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नसलेल्यांनी आम्हाला शिकवू नये. सावरकरांनी जे स्वातंत्र्य मिळवून दिलं ते आज धोक्यात आलं आहे. ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आम्ही आज एकत्र आलो आहोत. स्वातंत्र्यवीरांप्रमाणे आधी वागायला शिका, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. तसेच उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवही निशाणा साधला. एवढी वर्ष सत्तेत आहेत मग सावरकरांना भाजपने भारतरत्न का दिलं नाही. आठ वर्ष ते सत्तेत आहेत. केंद्र सरकारला काही अधिकार असतात. भारतरत्न देण्याचा अधिकार पूर्ण पंतप्रधानांचा आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेपूर्वी, त्यांच्या २०१९ चा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये १८ सप्टेंबर २०१९ ला विधानसभेचा प्रचार करताना उद्धव ठाकरे यांनी ‘राहुल गांधी समोर दिसले तर त्यांना जोडे मारले पाहिजे’. असं म्हटले होते. आज जर त्यांच्यासमोर राहुल आले तर ते २०१९ च्या विधानावर ठाम राहतील का? असा प्रश्न हिंदूत्वावादी संघटना विचारत आहेत.
गांधी काय म्हणाले ?
सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी राहुल गांधींवर परखड भाषेत टीका केली होती.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम