फटाक्याच्या दुकानातील कापडी पिशवीतून अडीच लाख लंपास

जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ ऑक्टोबर २०२२ ।  शहरातील मुख्य बाजार असलेले पोलन पेठ परिसरातील एका दुकानातून फटाक्याच्या दुकानातून २ लाख ५४ हजार रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आल्याने जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, शहरातील मुख्य बाजार पेठेतील पोलन पेठेतील महाराष्ट्र फटाका या दुकानातून दि ५ रोजी संध्याकाळी ते दि ६ रोजीच्या सकाळच्या दरम्यान कुणीतरी अनोळखी व्यक्तीने दुकानातील कापडी पिशवीत असलेले २ लाख ५४ हजार रुपये चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्याने दुकान मालक शब्बीर इलियास अमरेली यांनी दि ८ रोजी जळगाव शहर पोलीसात धाव घेत अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोना. विजय निकुंभ हे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम