मराठवाड्यात अडीच लाख लोकांना मिळाले कुणबी प्रमाणपत्राचा लाभ !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ६ नोव्हेबर २०२३

राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्यानंतर गुरुवारी सरकारमधील काही मंत्र्यांनी पाटलांची भेट घेत हे उपोषण तूर्त मागे घेतले असून त्यानंतर लागलीच मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत तपासणीनंतर प्रशासनाला कुणबी समाजाच्या 13 हजार नोंदी आढळल्या होत्या. त्याविषयीचा राज्य शासनाने हा अहवाल स्वीकारला. त्यानंतर निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनेही राज्य सरकारला अहवाल दिला. त्यावरून 31 ऑक्‍टोबर रोजी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शासन आदेश काढण्यात आला.

प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार मराठवाड्यातील अडीच लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते. मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेवरून राज्यभरात कुणबी समाजाच्या नोंदी शोधण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात मराठवाड्यात आणि अन्य प्रांतात ही संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. राज्य शासनाने 7 सप्टेंबर 2023 रोजी शिंदे समिती स्थापन केली आहे. या समितीने जिल्हानिहाय बैठका घेऊन कुणबी समाजाच्या नोंदीविषयी कागदपत्रे अभ्यासली. तेव्हा लोकांनी त्यांना काही पुरावेही दिले. सद्य:स्थितीविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की, मराठवाड्यातील किमान अडीच लाख लोकांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र मिळू शकते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम