शरद पवारांनी केली आ.खडसेंच्या प्रकुतीची विचारपूस !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ६ नोव्हेबर २०२३

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांना दि.५ नोव्हेबर रोजी रविवारी दुपारी अचानक छातीत वेदना जाणवल्या होत्या. त्यानंतर ते जळगावातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी खडसेंसाठी तातडीने एअर ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली. त्यामुळे खडसेंना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे. मात्र, आता त्यांची प्रकृती बरी असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रुग्णालयात जात एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम