अश्रू पुसण्यासाठी दोघेजण भेटले ; राऊतांचा टोला !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ मार्च २०२३ ।  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि २६ रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रात्री झालेली भेट म्हणजे सधू आणि मधूची भेट आहे. उद्धव ठाकरेंच्या मालेगाव येथील सभेनंतर दोघांच्या भावना उंचबळून आल्या असतील. त्यामुळे एकमेकांचे अश्रू पुसण्यासाठी दोघेजण भेटले असतील, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीबाबत पत्रकारांनी विचारले असता संजय राऊत म्हणाले, काल रात्री सदू-मधू भेटले त्यावर आम्ही काय बोलणार? दोघेही एकमेकांचे जुने मित्र आहेत. काल उद्धव ठाकरेंची मालेगावमधील विराट सभा पाहिल्यानंतर दोघांचे काही नव्याने उफाळून आले असेल. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर दोघांच्या भावना उंचबळून आल्या असतील. त्यामुळे एकमेकांचे अश्रू पुसण्यासाठी दोन्ही नेते भेटले असतील.

राज ठाकरेंवर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष म्हणजे पिसे गेलेला कावळा आहेत. 18 वर्षांनंतरही राज ठाकरेंचे राजकीय पर्यटनच सुरू आहे. सध्या सत्ताधाऱ्यांसोबत त्यांचे मॅच फिक्सिंग सुरू आहे. तेच त्यांनी चालू द्यावे. उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर मालेगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उत्तर सभा घेण्याची शक्यता आहे. यावर संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काहीच काम नाही. त्यामुळे ते आता उत्तरच काय तर दक्षिण, आग्नेय, वायव्य अशा सर्व सभा घेतली. खरे तर मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आत्महत्या का करत आहे?, हे समजून घ्यावे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम