पुण्यात दोन हजार कोटीचा प्रकल्प येणार; केद्र सरकारची घोषणा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ ऑक्टोबर २०२२ । गेल्या काही दिवसापासून चार ते पाच प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राज्य सरकारवर विरोधकांकडून टीकास्र सोडलं जातंय. परंतु आज केंद्र सरकारने एक घोषणा करुन महाराष्ट्रात दोन हजार कोटींचा प्रकल्प येणार असल्याचं सांगितलं आहे.

BJP add

केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री चंद्रशेखर यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. पुण्यातल्या रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घोषणा त्यांनी केली. सीडॅकचा इलेक्ट्रॉनिक डिझायनिंग प्रकल्प रांजणगावमध्ये येणार आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून २ हजार कोटींची गुंतवणूक आणि ५ हजार रोजगार उपलब्ध होतील, असा दावा केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलेला आहे.

नव्या उद्योगांना भारत सरकार प्रोत्साहन देत असून कोविडनंतर बदललेल्या मागणी आणि पुरवठ्याच्या साखळीमुळे उद्योगाचा चेहरा बदलत आहे. पूर्वी केवळ चीन उत्पादनाच्या केंद्रस्थानी होता. परंतु आता जगभरात उद्योग विकेंद्रीत होत आहेत. भारतसुद्धा निर्मितीमूल्यांना महत्त्व देत असल्याचं राज्यमंत्री चंद्रशेखर यांनी सांगितलं.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प परराज्यात जात आहेत. पुण्याच्या तळेगाव येथे होणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर टाटाचा एअरबस प्रकल्प जो नागपूरमध्ये होणार होता, तोदेखील गुजरातमधल्या वडोदऱ्याला गेला. काल पुन्हा एक प्रकल्प हैदराबाद येथे गेला आहे. फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन यांचा विमान इंजिन दुरुस्ती आणि देखभालीचा प्रकल्प नागपूर येथे होणार होता. परंतु हा प्रकल्प हैदराबादला गेला आहे. या प्रकरणामुळे केंद्र आणि राज्य सरकारवर होत असलेल्या आरोपांना सावरण्यासाठी आज केंद्राने पुण्याच्या रांजणगावमध्ये एक प्रकल्प घोषित केला असल्याचं बोललं जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम