आरक्षणासाठी २४ तासात दोन तरुणांनी संपविले जीवन !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २३ ऑक्टोबर २०२३

महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यापासून मराठा आरक्षणाच्या मुद्दा पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा समाज एकत्रित आला आहे. मराठा आंदोलकांकडून मराठा आरक्षणाची मागणी आणखी तीव्र होत आहे. तर मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्यावर विचार करण्यासाठी सरकारला दिलेला वेळ संपत आला आहे. एकीकडे, मनोज जरांगे यांनी काल पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातील लोकांच्या आत्महत्या सुरुच आहेच.

नांदेडमध्ये आणखी एका तरुणाने आरक्षणासाठी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. तरुणाच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट देखील सापडली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी विहिरीत उडी मारून जीव देत आहे, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये उल्लेख केला आहे. भोपाळ (ता.नायगाव) येथील ओमकार आनंदराव बावणे (16) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. ओमकारने रविवारी (22 ऑक्टोबर) सायंकाळी गावाशेजारील जंगली पीरजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, मृत्यूपूर्वी ओमकारने विहिरीवर सुसाईड नोट लिहून ठेवली होती.

विहिरीवर लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये ‘माझे आई वडिल मोलमजुरी करून आम्हाला शिक्षण शिकवत होते. पण त्यांची परिस्थिती मला पाहवत नव्हती म्हणून आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी विहिरीत उडी मारून जीव देत आहे,’ असा सुसाईड नोटमध्ये लिहले आहे. काल एकाच दिवशी नांदेड जिल्ह्यात दोघांनी आत्महत्या केली आहे. या घटनांमुळे समाजातून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. या घटनांमुळे हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम