आता गुगल करणार भारत पिक्सेल स्मार्टफोनचे उत्पादन

बातमी शेअर करा...

बातमीदार | २३ ऑक्टोबर २०२३

गुगल ही सर्च इंजिन कंपनी भारतात पिक्सेल मालिकेतील स्मार्टफोनचे उत्पादन करणार आहे, हे मोबाईल फोन पुढच्या वर्षी उपलब्ध होतील. गुगल पुढील वर्षी भारतात बनवलेली आठ उपकरणे सादर करण्याची योजना आखत असल्याचे गुगलचे उपकरण आणि सेवा विभागाचे वरिष्ट उपाध्यक्ष रिक ऑस्टरलोह यांनी सांगितले. गुगलच्या वार्षिक कार्यक्रमात भारतासाठी आपल्या उत्पादन योजनांची रूपरेषा त्यांनी स्पष्ट केली.

कंपनी भारतात फोन बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय उत्पादकांशी भागीदारी करेल. आम्ही भारतात गुगल पिक्सेल मालिकेतील स्मार्टफोन्सचे उत्पादन सुरू करू, असे ऑस्टरलोह यांनी ‘गुगल ‘फॉर इंडिया’ कार्यक्रमात सांगितले. गेल्या अनेक वर्षांमध्ये भारतात पिक्सेलची लक्षणीय वाढ पाहता कंपनीने पिक्सेल स्मार्टफोनसाठी देशाला प्राधान्य दिले आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशात पिक्सेल स्मार्टफोन तयार करण्याच्या कंपनीच्या योजनेचे समर्थन केल्याचेही त्यांनी सांगितले.

गुगलला भारतामध्ये तीन वर्षांत आपल्या ‘टेन्सर’ चिपसेटचे उत्पादन करण्यास सांगितल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी गुगलला प्रीमियम पिक्सेल फोल्ड डिव्हाईस भारतात लवकरात लवकर आणण्याची सूचना केली आहे. पूर्वी भारतात वापरण्यात येणारे ९८ टक्के मोबाईल फोन आयात केले जात होते. आता येथे वापरण्यात येणारे ९८ टक्के मोबाईल फोन येथे बनवले जातात. इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांना आता भारतात त्यांची केंद्रे सुरू करायची आहेत. भारत एक विश्वासार्ह पुरवठा साखळी म्हणून उदयास आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम