तर उद्धव ठाकरेंही याच विधीमंडळाचे सदस्य ; फडणवीसांची राऊतांवर टीकास्त्र !
दै. बातमीदार । १ मार्च २०२३ । राज्यातील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. संजय राऊत हे विधानमंडळाला चोर म्हणत आहे. पण उद्धव ठाकरे हे याच सभागृहाचे सदस्य आहेत. मग आम्ही सर्वच चोर ठरतोय का असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊत यांचे वक्तव्य हे सहन करण्यासारखे नाही, अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारातून निर्णय घ्यावा, आज जर आपण विषय गांभीर्याने घ्यायला हवे, अन्यथा असे हजारो राऊत विधीमंडळाच्या विरोधात बोलतील. राऊतांकडून विधीमंडळाचा अपमान झाल्याचेही फडणवीस म्हणाले. तर उद्धव ठाकरेंही याचा विधीमंडळाचे सदस्य आहेत, त्सांच्यासह आम्ही सर्व उद्धव ठाकरे यांच्यासह आम्ही सर्वच चोर ठरतोय? आम्ही काय गुंड आहे का असा संतप्त सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रातील विधानमंडळ देशातील सर्वोत्तम विधान मंडळ म्हटले जाते. पण विधान मंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार दिला तर मग या विधानमंडळावर कुणाचा विश्वास राहणार नाही. तसेच विधान मंडळावर कोणी काही बोलू नये म्हणून हक्कभंगाची व्यवस्था केली आहे, याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम