उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ८ सप्टेंबर २०२३ | राज्यात गेल्या एक महिन्यापासून पाऊस पडलेला नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकार दिलासा देत नसल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहे. त्यातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत. उद्धव ठाकरे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांचा त्यांना धीर देणार आहेत.

राज्याच्या अनेक भागांत गेल्या 25 दिवसांपासून पावसाचे टिपूसही पडलेले नाही. त्यामुळे शेतातील उभी पिके करपून गेली आहेत. शेतकऱ्यांपुढे आता भीषण संकट उभे ठाकले आहे. यावर राज्यातील मिंधे-भाजप सरकार कोणतीच ठोस पावले उचलत नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील बळीराजाला धीर देण्यासाठी उद्धव ठाकरे थेट शेतकऱ्यांना भेटणार असल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

नगर जिह्यात उद्धव ठाकरे एकदिवसीय शेतकरी संवाद दौरा करणार आहेत. नगरमधील राहाता तालुक्यातील राऊत वस्ती, कोलवड गाव येथे ते दुष्काळी स्थितीची पाहणी उद्धव ठाकरे करणार आहेत. कोपरगावातील कातरी गावात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर उद्धव ठाकरे संगमनेर आणि पुणतांबा येथेही ते भेट देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम