उद्धव ठाकरे घेणार दुर्घटनाग्रस्त जनतेची भेट !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ जुलै २०२३ ।  राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे इर्शाळवाडीच्या दिशेने रवाना झाले असून मातोश्रीहून त्यांच्या गाड्यांचा ताफा दुर्घटनास्थळाकडे निघाला आहे. काल आदित्य ठाकरे यांनी खालापूर येथील इर्शाळवाडी येथे परिस्थितीचा आढावा घेतला होता. देशात बदलत्या हवामानामुळे राज्यातील पावसाला जोरदार सुरुवात झाल्याने कोकणात पावसाचाह कहर सुरु असून यात रायगड जिल्ह्यातील इशाळवाडीतील अनके परिवार जमिनीखाली अडकले असून गेल्या तीन दिवसापासून येथे शोधकार्य सुरु आहे.

रायगड जिल्ह्यातील इशाळवाडीतील नुकसानग्रस्त परिसराची ते पाहणी करतील. तसेच स्थानिकांशी चर्चा करणार आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते यावेळी त्यांच्यासोबत असतील. या आधी आमदार आदित्य ठाकरे यांनी या भागाचा दौरा केला होता. इरशाळवाडीतील दुर्घटनेनंतर बचाव कार्य अजूनही सुरू आहे. येथील मृतांची संख्या आता 22 झाली असून अजूनही 102 नागरिकांचा शोध लागलेला नाही. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज इरशाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्त वाडीला भेट देणार आहेत. इरशाळवाडी जवळील पंचायत मंदिर नढाळ पासून पाच किलोमीटर वर बचावलेल्या ग्रामस्थांना ठेवण्यात आले आहे. तिथे पहिले उद्धव ठाकरे जाणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम