उद्धव ठाकरे घेणार जालन्यात आंदोलकांची भेट !
बातमीदार | २ सप्टेंबर २०२३ | मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर आता शरद पवार यांच्यानंतर उद्धव ठाकरे देखील आता आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे जालन्यात जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात गेल्या चार दिवसापांसून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात उपोषण सुरु होतं. मात्र, शुक्रवारी (01 सप्टेंबर) पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर दगडफेक आणि लाठीचार्ज करण्यात आला. दरम्यान आता या घटनेचे पडसाद राज्यभरात ठिकठिकाणी उमटताना पाहायला मिळत आहेत. तर ज्या ठिकाणी ही सर्व घटना घडली त्या अंतरवाली सराटी गावात सुरु असलेल्या आंदोलनास्थळी अनेक राजकीय नेतेमंडळी देखील भेटीसाठी जाताना पाहायला मिळत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे आज या गावात जाणार आहेत. उद्धव ठाकरे हे आंदोलकांची भेट घेतल्यावर अंबड येथील जखमी गावकऱ्यांची भेट घेऊन विचारपूस करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम