‘या’ मराठी अभिनेत्रीच्या जवळचा व्यक्ती रुग्णालयात !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २ सप्टेंबर २०२३ | राज्यातील प्रत्येक घराघरांत पोहोचलेलं नाव व बिग बॉस मराठीमध्ये नेहमीच चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली पाटील. सोनाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून सोनाली पाटील सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असताता. आता सोनालीच्या जवळच्या व्यक्ती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

अभिनेत्रीनं सोशल मीडियावर तिच्या भावाचा एक फोटो शेअर केला आहे, यामुळे तिचे चाहते चिंतेत आहेत.नुकताच सोनाली पाटीलनं इन्स्टावर तिचा भाऊ अभिजीत पाटीलबरोबरचा हॉस्पिटलमधला फोटो शेअर केला आहे. “माझं प्रेम, लवकर बरा हो,” असं लिहीत तिनं हा फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये सोनालीच्या भावाच्या हाताला आयव्ही ट्यूब लावलेली दिसत आहे. आणि सोनाली भावाबरोबर बोलताना पाहायला मिळत आहे.पतीच्या निधनानंतर पुन्हा प्रेमात पडलीये ही 51वर्षीय अभिनेत्री? ‘ती’ पोस्ट चर्चेतसोनालीनं भावाबरोबर शेअर केलेला फोटो पाहून तिच्या एका चाहतीनं कमेंट करत म्हटलं आहे की, ‘लवकरच तो बरा होईल. त्याच्यावर देवाची कृपा राहो.
तर दुसऱ्या चाहत्याने म्हटलं आहे की, ‘तुझ्यावर स्वामींची कृपा राहो.’ तसेच तिसऱ्या चाहत्यानं लिहीलं आहे की, ‘सोनाली ताई काय झालं?’ अशा असंख्य कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.सोनालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती स्टार प्रवाहवरील मालिका ‘वैजू नंबर 1’ मुळं लोकप्रिय झाली होती. ही तिची पहिलीच मालिका होती. मात्र बिग बॉस मराठी 3 ने तिला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले. ती सध्या ‘योग योगेश्वर जय शंकर’ या टीव्ही मालिकेत काम करत आहे.View this post on InstagramA post shared by Sonali Patil (@sonale_paatil42)सिनेसृ्ष्टीत येण्यापूर्वी सोनाली टीकटॉकवर लोकप्रिय होती. तिची लोकप्रियता पाहून तिला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. तर ती कॉलेमध्ये प्रोफेसर म्हणूनही काम करत होती.५६४५६

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम