केसरकर म्हणजे डोमकावळा ; संजय राऊत !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १० ऑक्टोबर २०२३

राज्यातील ठाकरेंच्या शिवसैनिकासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाचा प्रश्न आता सुटला आहे. मात्र, ही माहिती देताना एकनाथ शिंदे यांचे मंत्री दीपक केसरकर यांनी आम्हाला उद्धव ठाकरेंशी वाद घालायचा नसल्याचे म्हटले होते. यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केसरकरांवर टीका केली आहे. दीपक केसरकर म्हणजे मोती तलावातील डोमकावळा असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिंदेंच्या टोळीला खरी शिवसेना कोणाची? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शिंदेंच्या टोळीने आधी आरशात पाहावे, असा टोलाही त्यांनी लगावला. जगभरात कोठेही जा, शिवसेना कोणाची? असा प्रश्न विचारला तरी शिवसेना ठाकरेंचीच असल्याचे सांगेल, असा दावाही त्यांनी केला.

आगामी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेच्या कोणत्या गटाची सभा होणार यावरून या वर्षी देखील वाद सुरू झाला होता. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला मिळणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, शिंदे गटाचा दसरा मेळावा हा ओव्हल किंवा क्रॉस मैदानावर होणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. इतकेच नाही तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सहानुभूती मिळवण्याचा आरोपही केला आहे. त्याला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

खासदार संजय राऊत यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली. केसरकर म्हणजे सावंतवाडीतील मोतीतलावातला डोमकावळा आहे. हा केवळ पदासाठी सत्तेत आला आहे. त्यांच्या शिवसेनेत येण्याला आमचा विरोध होता, असा दावाही खासदार संजय राऊत यांनी केला आहे. केसरकर सत्तेसाठी पाठीत खुपसून निघून जाईल, याची आम्हाला खात्री होती. इतकेच नाही तर हा शिंदेच्या पाठीत चाकू खुपसून भाजपत निघून जाईल, अशी टीका देखील दीपक केसरकर यांनी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम