ठाकरे पुतण्याच्या मतदार संघात काकांची एंट्री !
बातमीदार | ४ नोव्हेबर २०२३ | राज्याच्या राजकारणात काका-पुतणे हे राजकीय नाते काही नवीन राहिलेले नाही. अगदी शरद पवार, अजित पवार, मुंडे परिवार तर आता ठाकरे परिवारात देखील या नात्यात राजकीय युद्ध सुरु असतांना नुकतेच राज ठाकरे यांनी आपल्या पुतण्याच्या मतदार संघात भेट दिल्याने राजकीय उधान आले आहे.
आज मुंबईतील वरळी भागातील बीडीडी चाळ येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भेट दिली. हा मतदार संघ ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा असून ठाकरेंच्या मतदारसंघात आज राज ठाकरे यांनी पाहणी केली आहे. वरळी बीडीडी चाळीमध्ये काम सुरु आहे याची पाहणी राज ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांशी देखील संवाद साधला.
तर वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. या ठिकाणी राज ठाकरे यांनी भेट दिली. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. राज ठाकरे यांनी स्थानिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. दरम्यान यावेळी स्थानिकांनी आपल्या तक्रारी, समस्या देखील राज ठाकरेंसमोर मांडल्याची माहिती आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम