जिल्ह्यात वर्दी डागाळली : पोलीस निरक्षकांसह दोन जण एसीबीच्या ताब्यात !
दै. बातमीदार । १९ जुलै २०२३ । भुसावळ शहरातील एका दाखल असलेल्या प्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी पाच लाखांची लाच मागून तडजोडीअंती तीन लाख रुपयांची लाच घेताना भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह रायटर तुषार पाटील व खाजगी पंटर ऋषी दुर्गादास शुक्ला यांना धुळे एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केल्याने जिल्ह्यातील पुन्हा एकदा पोलीस वर्दी डागाळली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, काही दिवसांपूर्वी बायोडिझेलची वाहतूक करणारा टँकर बाजारपेठ पोलिसांकडे कारवाईसाठी दिला होता मात्र गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात 15 लाखांची मागणी करण्यात आलीव सुरूवातीला तीन लाख रुपये घेवून नंतर पुन्हा 12 लाख रुपये मागण्यात आल्याने तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. ऋषी शुक्ला व तुषार पाटील यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली तर पोलीस निरीक्षकांसाठी लाच मागण्यात आल्याने त्यांना देखील अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागावाचे पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील, पो. हवा राजन कदम, पो कॉ. संतोष पावरा, पो.कॉ.रामदास बारेला, पो. हवा चालक सुधीर मोरे यांनी केली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम