केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले संघाचे अभिनंदन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ ऑक्टोबर २०२२ । नुकताच टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला पराभूत करून शानदार सुरुवात केली आहे. संपूर्ण देशासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही भारतीय संघाचे खास शैलीत अभिनंदन केले आहे. पाकिस्तानवर विजय मिळविल्याबद्दल प्रत्येकजण टीम इंडियाचे अभिनंदन करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ट्विट करून लिहिले की, ”टी-20 विश्वचषक सुरू करण्याचा योग्य मार्ग, दिवाळी सुरू होत आहे. विराट कोहलीची शानदार खेळी. संपूर्ण संघाचे अभिनंदन.”

 

भारतीय संघाने मेलबर्नमध्ये टी-20 विश्वचषक 2022 चा पहिला सामना पाकिस्तानसोबत खेळला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इफ्तिखार अहमचे अर्धशतक आणि शान मसूदच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानने 20 षटकांत 8 बाद 159 धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य ठेवले.

प्रत्युत्तरात टीम इंडियाने या धावसंख्येचा पाठलाग करताना 20 षटकांत 6 विकेट गमावत 160 धावा केल्या आणि सामना 4 विकेटने जिंकला. या सामन्यात विराट कोहलीने त्याला ‘द चेस मशीन’ का म्हटले जाते हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विराट कोहलीने 53 चेंडूत 82 धावांची शानदार खेळी केली. विराट कोहलीने या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम