जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फळ पिक विमा लाभ आणि हॉर्टीकल्चर क्लस्टर कार्यक्रमाची मागणी
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची भेट घेतली
सावदा प्रतिनिधी: पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना अंतर्गत आंबिया बहार 2022 मध्ये विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना अद्याप पिक नुकसानीसाठी विम्याचा लाभ मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी, श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मागणीनुसार आणि तत्कालीन कृषिमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी, जळगांव यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली होती. या समितीकडे 11022 शेतकऱ्यांपैकी 8190 शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवल्या होत्या, ज्यातील 6686 शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी पडताळणी करून पात्र ठरविण्यात आले आहे.
केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी या प्रलंबित लाभासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची भेट घेतली.
जळगाव जिल्ह्याचा हॉर्टीकल्चर क्लस्टर कार्यक्रमात समावेश
जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक केळी उत्पादन करणारा जिल्हा आहे. जिल्ह्यात 1 लाख हेक्टर सुपिक जमीन केळी उत्पादनासाठी उपलब्ध असून, जिल्ह्यातील केळीची देश-विदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याचा फलोत्पादन समूह विकास कार्यक्रमाच्या (हॉर्टीकल्चर क्लस्टर) प्रायोगिक टप्प्यात समावेश करण्याची मागणी श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे केली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम