दुदैवी : धावत्या रेल्वेतून पडून तरुण शिक्षकाचा मृत्यू !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १८ नोव्हेबर २०२३

जळगाव ते शिरसोली दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने रुस्तमजी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील तरूण शिक्षकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. मयत तरूण हा मामाकडे जावून परतीच्या प्रवासात असतांना ही घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील विजय शाम सोनी असे मयत झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. विजय शाम सोनी हे जळगावातील रूस्तमजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते. ते मुळ रहिवाशी मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर येथील रहिवाशी आहेत. दरम्यान दिवाळी निमित्त ते कल्याण येथील मामांकडे भेटण्यासाठी गेले होते. कल्याणहून परत ते मुळगावी बऱ्हाणपुर येथे जाण्यासाठी बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी रेल्वेने प्रवास करीत आहे. जळगाव ते शिरसोली दरम्यान रेल्वेतून प्रवास करत असतांना रेल्वे खंबा क्रमांक ४०७जवळ धावत्या रेल्वेतून विजय सोनी हे पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना घडल्यानंतर जळगाव रेल्वे पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल सचिन भावसार यांनी घटनास्थळी धाव घेवून जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सचिन भावसार करीत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम