नक्षली स्फोटांत दोन जवान शहीद !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १८ नोव्हेबर २०२३

झारखंडमध्ये शुक्रवारी नक्षल्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान शहीद झाला. दुसरीकडे निवडणूक सुरू असलेल्या छत्तीसगडमध्येही नक्षल्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात आयटीबीपीचा एक जवान शहीद झाला.

पहिल्या घटनेत छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात नक्षल्यांनी दुपारी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात भारत-तिबेट सीमा पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल जोगिंदर सिंह शहीद झाले. विधानसभा निवडणुकीच्या पथकाला सुरक्षा पुरवण्यासाठी तैनात जवानांना लक्ष्य करण्यासाठी बडेगोबरा गावानजीकच्या जंगलात नक्षल्यांनी हा स्फोट घडवून आणला. यानंतर सुरक्षा दलाने निवडणूक पथकातील सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. तर दुसरीकडे झारखंडच्या नक्षलग्रस्त पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील स्फोटात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला, तर दोघे जखमी झाले. सीपीआय (माओवादी) या नक्षली गटाने हा शक्तिशाली स्फोट घडवून आणला. जिल्ह्यातील गोईलकेरा क्षेत्रात सुरक्षा दलातर्फे अभियान सुरू असताना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम