हवामान विभागातून अपडेट : तीन राज्याला ऑरेंज अलर्ट जारी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ मे २०२३ ।  देशासह अनेक राज्यात उष्णतेच्या कहरानंतर आता पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पावसाबाबत महत्त्वाची अपडेट्स हाती आली आहे. त्यानुसार तीन राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. केरळ, कर्नाटकात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. देशाला आता उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळत आहे, कारण अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) येत्या काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवताना मुसळधार पाऊस कोसळेल असे म्हटलेय.

BJP add

28 मे रोजी हरियाणा, ईशान्य राजस्थान आणि उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळ आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात देखील 28 मे पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळासह हलका ते मध्यम पाऊस पुढील तीन दिवसांत मध्य प्रदेशात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे, असे IMD ने व्यक्त केली आहे.

हवामान विभागाने हरियाणा, ईशान्य राजस्थान आणि उत्तर प्रदेशसाठी ऑरेंज अलर्टही जारी केला आहे. पुढील दोन दिवस दिल्लीत गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या वादळाची शक्यता आहे. 30 मे आणि 31 मे रोजी राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ आणि पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे.

केरळमध्ये गडगडाटासह वादळे, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि पुढील पाच दिवसांत कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये पाऊस सर्वत्र विखुरलेला असेल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

दरम्यान, देशभरात सरासरीइतका म्हणजे 96 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज आहे. देशभरात पूर्व मोसमी पाऊस सरासरीपेक्षा 12 टक्के अधिक, तर मेमध्ये सरासरीपेक्षा 8 टक्के अधिक पाऊस पडला. ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. देशातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटांची नोंद झाली. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उष्णतेची लाट कमी आल्याचे सांगण्यात आलेय. तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये जून महिन्यात कमी पाऊस असेल. तर संपूर्ण महाराष्ट्रात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहू शकते. जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात मान्सून सामान्य राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम