
अपघाती निधन झाल्येल्या कर्जदाराचे वारसांना विमा क्लेम दि अमळनेर को ऑप अर्बन बँक या संस्थेद्वारा प्रदान
अमळनेर (प्रतिनिधी )अमळनेर तालुक्यातील आर्थिक जीवनदायी म्हणून ओळख असणाऱ्या दि अमळनेर को ऑप अर्बन बँकेचे सभासद वकर्जदार राजेंद्र नारायण सुतार यांचा अपघात विमा बँकेद्वारे युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी कडे करणेत आला होता. राजेंद्र सुतार यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या वारसांना विमा रकमेची रक्कम रुपये, 1लाख (100000) मिळणे कामी बँक दुवारे आवश्यक कागद्पत्रांची पूर्तता व पाठपुरावा विमा कंप. कडे करण्यात आला व त्या द्वारे सम्बन्धीताचा विमा क्लेम मंजूर होऊन आल्याने बँकेचे चेअरमन, व्हा चेअरमन, सर्व संचालक, कार्यकारी अधिकारी, विमा प्रतिनिधी, श्री प्रशांत संघवी यांचे उपस्थित वारस श्रीमती सरलाबाई राजेंद्र सुतार यांना विमा क्लेम ची रक्कम प्रदान करण्यात आली या कामी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी चे मॅनेजर श्री भीमसिंग ठाकूर साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम