जळगाव शहराच्या विकासासाठी त्वरीत निधीची मागणी; माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांचे निवेदन

बातमी शेअर करा...

जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने त्वरीत निधी उपलब्ध करून द्यावा, असे निवेदन माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना सादर केले आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, जळगाव शहरातील अनेक कॉलनींमध्ये नागरी सुविधांचा अभाव आहे. काही ठिकाणी रस्ते व गटारींची कामे अजूनही अपूर्ण आहेत, ज्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. या समस्यांच्या पार्श्वभूमीवर, माजी उपमहापौर डॉ. सोनवणे यांनी 300 कोटी रुपये निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे.

माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांतून शहराला निधी मिळाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने 25 कोटी व नंतर 100 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता, ज्यामुळे अनेक रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. मात्र, अजूनही अनेक रस्ते व गटारींची कामे प्रलंबित आहेत.

डॉ. सोनवणे यांनी 300 कोटी रुपये रस्त्यांसाठी व 100 कोटी रुपये गटारींसाठी मंजूर करण्याची विनंती केली आहे, ज्यामुळे शहराचा विकास होईल व नागरी सुविधांची गुणवत्ता वाढेल.

निवेदन देतेवेळी भाजपा महानगर अध्यक्ष उज्वला बेंडाळे, लोकसभा प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, माजी उपमहापौर सुनील खडके, भाजपा सरचिटणीस अमित भाटिया, सौरभ लुंकड, डॉ.क्षितिज भालेराव उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम