जळगाव दुध संघामार्फत लम्पी आजाराकरिता लस उपलब्ध

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | 15 सप्टेंबर 2022 | जळगाव जिल्ह्यातील पशुपालकांच्या जनावरांना लंम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या आजारामुळे दुध उत्पादक शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हा विषाणूजन्य रोग गाई व म्हशी दोघांमध्ये आढळून येत आहे. या रोगाचा प्रसार डास, माशी, गोचीड आदींमुळे तसेच बाधित जनावरांच्या खाद्यातून व पाण्यातून होत असतो. या आजाराच्या लक्षणांमध्ये जनावराला ताप येतो, शरीरावर गाठी येतात, तोंडात व श्वासनलिकेत फोड येतात. मोठ्या प्रमाणावर लाळ गळत राहते व डोळ्यांवर तसेच पायावर सूज येते.

लंम्पी या त्वचा रोगाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी जळगाव दुध संघाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गोट पॉक्स लस खरेदी करण्यासाठी पुढाकार घेऊन ५० हजार मात्रा उपलब्ध करून देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. सध्या २५ हजार प्रतिबंधक लसीच्या मात्रा दुध संस्थेमार्फत पुरवठा करण्यात आलेला आहे तरी तातडीने जनावरांना लसीकरण करण्यात यावे. यामुळे रोगावर प्रतिबंध होवून आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होईल, तरी दुध संस्थांनी दुध संघाच्या पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन दुध संघातर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम