वडेट्टीवार हे बुद्धीभ्रष्ट : आ.अमोल मिटकरींची टीका !
बातमीदार | १५ नोव्हेबर २०२३
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांना चरणदास म्हणतात त्यांच्यावर टीका केल्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते आ.अमोल मिटकरी यांनी थेट विजय वडेट्टीवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शाह यांनी भेट घेतल्यानंतर त्यावर विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. त्याला अमोल मिटकरी यांनी उत्तर दिले. तुम्ही अजितदादांचा आणि वडेट्टीवार यांचा चेहरा पाहा. कोणाच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असते आणि कोण महाराष्ट्राचा दादा आहे, हे सर्वांना माहीत आहे, असेही अमोल मिटकरी म्हणाले.
अमोल मिटकरी म्हणाले की, अजित पवार यांची धमक हे महायुतीमध्ये गेल्यानंतरसुद्धा कायम आहे. सोशल इंजिनिअरिंग करून सर्वपक्षीय मंत्रिमंडळ बनवून अजित पवार हे अर्थमंत्री म्हणून उत्तम कारभार पाहता आहेत. वडेट्टीवार यांचे नाचता येईना, अंगण वाकडे, असे झाले आहे. वडेट्टीवार हे बुद्धीभ्रष्ट झाल्याप्रमाणे आणि डोक्यावर पडल्यासारखे बोलायला लागले आहेत. अमोल मिटकरी म्हणाले की, विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये जायला निघाले होते. त्यामुळे ते भाजपमध्ये जाऊ नयेत; म्हणून काँग्रेसने त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिले आहे. भाजपनेही त्यांना पक्षात घेण्यास नकार दिला होता. चरणदास हा शब्दही कमी पडेल, असे त्यांचे त्यावेळचे वर्तन होते. त्यांनी इथून पुढे अजितदादांवर बोलताना भान ठेवून बोलावे. नाहीतर आम्ही पण जशास तसे उत्तर द्यायला तयार आहोत, असा इशारा मिटकरी यांनी वडेट्टीवार यांना दिला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम