प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना डेंग्यूची लागण

बातमी शेअर करा...

बातमीदार | १५ नोव्हेबर २०२३

राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही दिवसापासून प्रकुती बरी नसल्याने त्यांनी अनेक शासकीयसह खाजगी कार्यक्रम पुढे केले होते त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी डेंग्यू झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली असून यासोबत मेडिकल रिपोर्ट सुद्धा पोस्ट केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर जयंत पाटील डेंग्यूग्रस्त झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

जयंत पाटील यांनी ट्विट करून म्हटले आहे की, “कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. थोड्या वेळापूर्वीच त्याचे रिपोर्ट आले असून मला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवस विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरवात करेन.”

जयंत पाटील हे शरद पवार गटाचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे त्यांनी लवकर बरे व्हावं, अशी प्रार्थना कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. तसेच, आगामी काळात लोकसभेची निवडणूक असणार आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी आजारपणातून लवकर बाहेर पडणे, हे शरद पवार गटासाठी महत्त्वाचे आहे. दरम्यान, जयंत पाटील यांच्या कार्यालयाकडूनही या वृत्तावर दुजोरा देण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण झाली आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे , अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम