नगरपालिकेत मनसेच्या कार्यकर्त्यांची तोडफोड !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ११ ऑगस्ट २०२३ | बीड शहरातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये दोन दिवसांपूर्वीच मनसे कार्यकर्त्यांनी रांगोळी काढून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले होते. तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली होती. तसेच, याचवेळी रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास नगरपरिषदेमध्ये तोडफोड करू, असा इशाराही मनसेकडून देण्यात आला होता. या आंदोलनानंतरही प्रशासनाने रस्त्यांच्या डागडुजीसाठी कोणतीच पावले उचलली नाही, असा आरोप करत मनसे कार्यकते आज नगरपालिकेत शिरले व सीईओ नीता अंधारे यांच्या कार्यालयात जात तोडफोड केली. आंदोलनकर्त्या मनसे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की, बीड शहरातील मोंढा आणि एमआयडीसी भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनकेदा मागणी करूनही या रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढल आहे.

रस्त्यावर पडलेले खड्डे व ऐन पावसाळ्यात यावरून नागरिकांची होणारी तारांबळ यावरून बीडमध्ये मनसे कार्यक्रते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी बीड नगरपालिकेच्या सीईओ नीता अंधारे यांच्या कार्यालयात शिरून आज तोडफोड केली. ही घटना कार्यालयातील सीसीटीव्हीत कैद झाली असून हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आंदोलकांनी म्हटले आहे की, या रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी, यासाठई मनसेकडून अनेकदा नगरपालिकेला निवदेन देण्यात आले. मात्र, प्रशासनाकडून कोणतीच हालचाल दिसत नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोंढा आणि एमआयडीसी भागात जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आणि शाळकरी मुलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अमरधाम स्मशानभूमी ते जालना रोडला जोडणारा रस्ता हा मोठया बाजार पेठेला जोडणारा प्रमुख रस्ता असून, शहरातील नागरिक तसेच शाळकरी मुलेदेखील या रस्त्याचा वापर करतात. मात्र काही दिवसापासून या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम