वाहन चालक मालक संघटना हिवाळी अधिवेशनावर देणार धडक : तालुका अध्यक्ष अनिल महाजन

बातमी शेअर करा...

भडगाव /प्रतिनिधी

वाहनचालकांनसाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजनेची घोषणा करण्यात आली होती.अध्यादेश पण काढण्यात आला.परंतु शासनाच्या गाईड लाईन अद्याप प्राप्त झालेल्या नाहित हे कारण देऊन अपघाती जखमींना खाजगी हास्पीटल मधे उपचार नाकारण्यात येत आहेत.तसेच वाहन चालकांच्या आर्थिक महामंडळाची महाराष्ट्र सरकारच्या वतीने वारंवार घोषणा करूण योजनेची अमलबजावणी सुरु करण्यात आलेली नाही. या प्रमुखमागणीसह इतर प्रलबिंत मागण्यासाठी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था 13 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर यांच्या नेतृत्वाखाली धडक देन्यात येईल असे निवेदन तालुका अध्यक्ष अनिल महाजन यांच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

मागील हिवाळी अधिवेशनात जय संघर्ष वाहन चालक संघटनेच्या हजारो पदाधिकार्‍यांनी धडक देत मोर्चात अनेक मागण्याचे निवेदन वाहन चालक संघटनेने शासनाला दिले होते. परंतु एक वर्षानंतरही आश्‍वासनाची पुर्तता शासनाने केलेली नसल्याने वाहन चालकांसाठी आर्थीक महामंडळ स्थापन करण्यात यावे, ई चालानच्या नावाने परिवहन अधिकार्‍यांची होणारी लुट थांबविण्यात यावी, जिप या प्रकारामध्ये येणार्‍या सर्व प्रवासी वाहतुक वाहनांच्या प्रवासी क्षमतेत वाढ करावी, वाहन चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर कायदे करावे, वाहन चालकांच्या पाल्यास विभाग स्तरावर वसतीगृह, मोफत शिक्षणाची सोय, बांधकाम मजुरास दिल्या जाणार्‍या सुविधा, अपघाती मृत्यू झाल्यास 25 लाख रुपये, कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास दहा लाख रुपये, शहरीभागात मोफत घरे, पर्यटनांच्या ठिकाणी वाहन चालकांसाठी विश्रांतीची सोय, 17 सप्टेंबर वाहन चालक दिवस घोषीत करण्यासोबतच समृद्धी महामार्गावरील गैरसोय लक्षात घेता महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक साठ ते सत्तर की. मी. अंतरावर मोफत हवा, संडास, बाथरूम, तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी, अशा अनेक प्रलबिंत मागण्या आहेत. या मागण्यासाठी यंदाही हिवाळी अधिवेशनावर वाहन चालक संघटना धडक देणार आहे.

या मोर्चात सर्व वाहन चालक मालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था प्रणित जय संघर्ष वाहन चालक,चालक मालक संघटनेचे भडगाव तालुका अध्यक्ष अनिल एकनाथ महाजन, उपाध्यक्ष निलेश पाटील, अफसर दादा, संजय पाटील वाक, बाळासाहेब पाटील, राजु मामा, अजिज मनियार, योगेश भाऊ, राकेश पाटील, भैय्या नरवाडे, कैलास बडगूजर, राकेश पाटील, शंकर पाटील सर्व चालक बाधवांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम