सुनील शिंपी यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या प्रदेश संघटक पदी नियुक्ती

advt office
बातमी शेअर करा...

अमळनेर(प्रतिनिधी)

येथील सुनील शिंपी यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या प्रदेश संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील,विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे,युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत सुनील शिंपी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुनील शिंपी यांनी सांगितले.
सुनील शिंपी यांच्या नियुक्तीबद्दल आमदार अनिल भाईदास पाटील,जि.प.सदस्या जयश्री पाटील,बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील,तालुकाध्यक्ष सचिन पाटील,शहराध्यक्ष मुक्तार खाटीक,जळगाव जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष भूषण भदाणे यांनी सुनील शिंपी यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम